इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

देवरुख दि. ६ :- प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथील अंतिम वर्ष ‘बी. फार्म.’ आणि डी. फार्म (B. फार्म & D. Pharm) च्या विद्यार्थ्यांनी विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संस्थेच्या प्रभावी शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे यावर्षीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश मिळाले आहे.
विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थी कु. सुजित गाडवे, कु. अथर्व मांडवकर, कु. सृष्टी शेलार, कु. ओंकार वाघमारे आणि कु. साहिल पिंपळे. कु. दिनांती देवस्थळी, कु. क्रांती साळवी आणि कु. सिद्धी पाटील, कु. अक्षय कोकारे आणि कु. सानिका झोरे, कु. प्रियांका यादव.
या सर्व नामांकित उद्योगांनी संस्थेच्या महाविद्यालयावर जो विश्वास दाखवला आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी अमूल्य संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्राचार्यानी या सर्व कंपन्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



