विल्ये येथे त्यागमूर्ती माता रमाई स्फूर्तीदिन विशेष उपक्रमातून संपन्न

विल्ये दि. ३१ (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुक्यातील मौ. विल्ये, बौद्धजन विकास कमिटी स्थानिक आणि मुंबई कमेटी तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मानका आप्पा समिती, डी.सी.सी क्रिकेट क्लब आणि मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांचा ९१ वा स्मृतिदिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण नियोजित अध्यक्ष जनार्दन कांबळे आणि प्रमुख पाहुणे रेशम जाधव – समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवेज कांबळे यांनी केले. त्यानंतर श्रामनेर आणि बौद्धाचार्य अरविंद कांबळे, बौद्धचार्य विरेंद्र कांबळे यांच्या सोबत मीना कांबळे यांच्या माध्यमातून बौद्ध पूजा पाठ घेण्यात आले.
सदर कार्यक्रमात माता रमाईंच्या जीवनपटावर अभ्यासु वाचनातून समजलेली उमगलेली माय माता रमाईंच्या बहुमोल परिश्रम आणि त्याग, निर्भीडपणा, स्वाभिमानी बाणा याबद्दल विद्रोही कवी राकेश कांबळे आणि धम्म उपासिका प्राची कांबळे यांनी आपले प्रभावी मार्गदर्शक विचार मांडले. या कार्यक्रमानंतर २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून त्यांना सन्मानित करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन विरेंद्र कांबळे यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने केले.
या कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या देहादान, नेत्रदान या जनजागृती कार्यक्रमात छाया सिताराम कांबळे आणि सिताराम भागा कांबळे यांनी मरणोत्तर देहदानाचे महत्वपूर्ण प्रेरणादायी उचलेले पाऊल त्याकरिता करिता त्यांना कमेटीकडून सन्मानपत्र देवून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कौतुक करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रम अध्यक्ष जनार्दन कांबळे आणि प्रमुख पाहुणे रेशम जाधव – (समाज सेवा अधीक्षक (वैद्यकीय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय रत्नागिरी ) मंचावर उपस्थित होते. त्यानंतर डीसीसी आयोजित क्रिकेट स्पर्धेत संघाने प्रभावी आणि यशस्वी कामगिरी केल्याबद्दल क्रिकेटर संकेत कांबळे आणि प्रेम कांबळे, लक्षद्विप कांबळे यांच्या उपस्थितीत डीसीसी संघाचा संघटनेकडून सन्मान करण्यात आला. तसेच विल्ये गावचे सुपुत्र लेखक दिग्दर्शक सुधीर कांबळे यांच्या “पेढा ” या शॉर्ट फिल्म चे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे फेस्टिव्हल पुरस्कार करिता नामांकन झाले त्याकरिता कमेटीकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी मिलिंद जलसा कला निकेतन मंडळाचे आजी- माजी कलाकार, गायक, तसेच डी.सी.सी क्रिक्रेट क्लब चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विल्ये मुबंई कमेटी आणि स्थानिक कमेटी कार्यकर्ते आणि सदस्य यांनी बहुमोल योगदान दिले.


