रत्नागिरी

रत्नागिरीतील गॅस शवदाहिनी तात्पुरती बंद :  मुख्याधिकारी

रत्नागिरी दि. २८ :- रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत शिवाजीनगर, चर्मालय स्टॉप, मजगांव रोड येथील स्मशानभूमीत प्रेतांचे दहन करण्यासाठी बसविण्यात आलेली गॅस शवदाहिनी दि. २७ मे २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

नगरपरिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटनुसार, गॅस शवदाहिनीमध्ये आवश्यक तांत्रिक दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार आहेत. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी आणि पर्यायी व्यवस्था वापरावी, असे आवाहन मुख्याधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button