क्रीडारत्नागिरी

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत संगमेश्वरच्या खेळाडूंनी पटकाविली २५ सुवर्ण, ८ रौप्य, १३ कांस्य पदक

देवरूख दि. १९ :-  रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी संघ, रत्नागिरी, यांच्या सहकार्याने आयोजित 19 वी क्युरोगी व 13 वी पुमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सन 2025-26 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

ही स्पर्धा जिल्हा संघटना अध्यक्ष राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कर्रा,जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, जिल्हा सचिव लक्ष्मण के. जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी, आयोजक राम कर्रा,पंच प्रमुख भरत कर्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये संगमेश्वर, तालुक्यासह जिल्हातील सुमारे 600 खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब या सर्व क्लबचे खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये संगमेश्वर तालुक्याच्या खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पुमसे मध्ये द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला व फ्री-स्टाइल पुमसे मध्ये तृतीय क्रमांकाचा चषक पटकावला तसेच सब-ज्युनिअर गटामध्ये रीतीशा कांगणे हिने फाईटमध्ये सुवर्णपदक पटकावून बेस्ट फाईटरची ट्रॉफी प्राप्त केली व कॅडेट गटामध्ये साहिल जागुष्टे ह्याने फाईटमध्ये सुवर्णपदक पटकावून बेस्ट फाईटरची ट्रॉफी प्राप्त केली उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुक्याचे नाव उंचावले.

क्युरोगी प्रकारामध्ये पुढील खेळाडूंनी पदक पटकावले

*स्पेशल मुली* 1. जीविता देशपांडे कांस्य पदक

2. शुभ्रा माळी सहभाग

*स्पेशल मुले* 1. निकुंज घडशी रौप्य पदक

2. अनुराग यादव कांस्य पदक

सब ज्युनिअर मुली

1.रीतीशा कांगणे सुवर्णपदक

2.सई संसारे रौप्य पदक 3. अवनी भिंगार्डे रौप्य पदक 4.नक्षत्रा शिंदे सहभाग 5. श्रावणी कोळवणकर सहभाग 6. पूर्वा वनकर 7. मिहिका लाड

सब-ज्युनियर मुले

1. शौनक राजवाडे कांस्य पदक 2.गंधार रेवडेकर कांस्य पदक 3.शौर्य माळी सहभाग 4.ईशान भागवत सहभाग 5.वेदांत मसुरकर सहभाग 6.प्रभात रहाटे सहभाग 7. ऋतिक कांगणे सहभाग.

कॅडेट मुली

1. ईश्वरी कांगणे सुवर्णपदक 2.शुभ्रा सुर्वे सहभाग 3. पुर्वा रहाटे सहभाग

कॅडेट मुले

1.साहिल जागुष्टे सुवर्णपदक 2.मंथन चव्हाण रौप्य पदक 3.अजिंक्य शिंदे कांस्य पदक 4. यश तांबे सहभाग 5. वेद पटेल सहभाग 6. वेदांत मसुरकर सहभाग 7. मल्हार साने सहभाग 8. अफजान फुलारी सहभाग

ज्युनियर मुले

1.आदित्य चिपळूणकर कांस्य पदक 2.सोहम चव्हाण सहभाग

सिनियर मुले

1.ओम घाग सुवर्णपदक 2.सुमीत पवार कांस्य पदक 3.गंधर्व शेट्ये कांस्य पदक 4.दक्षसिंग राठोड कांस्य पदक

पूमसे प्रकारात :- 

सब ज्युनिअर मुली

1.पूर्वा वनकर=3 सुवर्णपदक,2 रौप्य पदक,1 कांस्य पदक 2.नक्षत्रा शिंदे= 2सुवर्णपदक 3.रीतीशा कांगणे = 1 सुवर्णपदक

सब ज्युनियर मुले

1. शौर्य माळी= 5 सुवर्णपदक,1 रौप्य पदक

2. ईशान भागवत= 2 सुवर्णपदक

3. ऋतिक कांगणे= 1सुवर्णपदक

4.वेदांत मसुरकर 1 सुवर्णपदक पदक

कॅडेट मुले

1. साहिल जागुष्टे=1 सुवर्णपदक

2. सोमांश सावंत =1 सुवर्णपदक, 1 कांस्य पदक

3. =अफजान फुलारी= 1 कांस्य पदक

ज्युनियर मुले

1. साहिल जागुष्टे=1 सुवर्णपदक

2. सोमांश सावंत=1 कांस्य पदक

सिनियर मुले

1. सुमित पवार=2 सुवर्णपदक ,1 रौप्य पदक

सिनियर मुली

1. मयुरी राऊत= 1 सुवर्णपदक

या यशस्वी तायक्वांडो पट्टूंचा सत्कार समारंभ नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब देवरुख येथे देवरुख शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब प्रशिक्षक स्वप्नील दांडेकर, सुमीत पवार, यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार समारंभ करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button