रत्नागिरी

देवरुख शहरातील मुख्य रस्त्याचे कामाची नगरसेविका सौ. प्राची भुवड यांनी केली पाहणी

उत्तम दर्जाचे डांबरीकरण करण्याच्या दिल्या सूचना!

देवरुख दि. ९ (सुरेश सप्रे ) :-  देवरुख शहरातील चोरपऱ्या ते मुस्लिम मोहल्ला (मशिद) या शहरातील मुख्य रस्त्याची चाळण झालेने वाहतुकीचा खोळंबा होतो. हे लक्षात घेत आम. शेखर निकम यांनी यांनी दखल घेत या कामासाठी ६५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.

सदरचे रस्ताचे टेंडर प्रक्रिया होवून ही राजकीय पक्ष साठमारीत हे काम सुरू झाले नसल्याने उलट सुलट चर्चा सुरू होत्या. यावर काही पत्रकारांनी आवाज उठवल्यावर आम. निकम यांनी दखल घेत ते काम सुरु करण्याच्या सुचना दीलेवर सदर कामाला दी ६रोजी सुरुवात झाली आहे. हे काम आपल्या वार्डातील असल्याने ते रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाचे व्हावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ प्राची भुवड यांनी साईटवर जात कामाची पहाणी केली. संबंधित ठेकेदार प्रतिनिधीना चांगल्या दर्जाचे काम करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, उबाठासेनेचे इशत्याक कापडी, नगर पंचायत अभियंता मानसी कांबळे, सुतेज यादव हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button