क्रीडारत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील कराटेपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी दि. ७ : कराटे असोशियन रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी यांच्यावतीने जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणी दि. 30 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये उत्साहात पार पडली.

या निवड चाचणीत जिल्ह्यातील विविध वयोगटांतील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. सदर राज्यस्तरीय स्पर्धा डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आडगाव नाका, नाशिक येथे कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे :

सब-जुनिअर गटात 40 किलो खालील वजन गटात कुमार ओम राजेंद्र शिर्के यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर 54 किलो खालील वजन गटात कुमारी सावरी संजय राठोड हिने प्रथम क्रमांक मिळविला.

कॅडेट गटात 52 किलो खालील वजन गटात कुमार कार्तिक प्रकाश राठोड तसेच 57 किलो खालील वजन गटात कुमार ध्रुव धनंजय बसणकर यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.

ज्युनिअर गटात 48 किलो खालील वजन गटात कुमारी रिया मंगेश माचकर हिने प्रथम क्रमांक मिळवून आपली छाप पाडली.

या खेळाडूंना कराटे असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री.जावेद ह. मिरकर , श्री.सुरज वी. बने (सचिव) व श्री.अरुण जु. बेग (खजिनदार) यांचे मार्गदर्शन लाभले.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, राज्यस्तरावरही ते यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button