क्रीडारत्नागिरी

इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट लीगमध्ये दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधीत्व करतोय रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे!

पहिल्याच सामन्यात अविराजची अष्टपैलू कामगिरी!

रत्नागिरी दि. १ :- २०२६ च्या इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट लीगमध्ये दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याला मिळाला आहे. या हंगामातील पहिल्याच मॅचमध्ये ‘लंडन टायगर्स’ संघाविरु‌द्ध खेळताना अविराजने अष्टपैलू कामगिरी केली आहे.

२०२५ च्या काउंटी क्रिकेट लीगमध्ये ६ वेळा सामनावीरचा किताब व उत्कृष्ट गोलंदाजचा किताब पटकावून उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे यावर्षी सुद्धा मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगसाठी अविराजची निवड झाली आहे.

या हंगामातील पहिल्याच मॅचमध्ये ‘लंडन टायगर्स संघाविरु‌द्ध खेळताना अविराजने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. या सामन्यात अविराजने ३६ बॉलमध्ये ४८ रन्स केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने ४.५५ च्या सरासरीने ९ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मैदानात फिल्डिंग करताना एकाला झेलबाद केले.

यावर्षी अविराज मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगच्या १५ मॅचेस तसेच मिडलसेक्स प्रिमियर लीगच्या १३ मॅचेस खेळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button