रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे येथे उभ्या ट्रकला वॅगनार कारची धडक; सहा जण जखमी

रत्नागिरी दि. १ :- दि. 1 मे 2026 रोजी भल्या पहाटे 3:10 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे येथील एसएमएस हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक KA 02 AG 2025 ला मुंबईतील भांडुप येथून मालवणच्या दिशेने जात असलेल्या वॅगनार कार क्रमांक MH 03 FC 1145 ने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी कार्यरत विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थ सुजित शिंदे व शुभम यांच्या मदतीने जखमींना त्वरित मदत करण्यात आली.

अपघातातील जखमी पुढीलप्रमाणे आहेत:

जयेश राज शर्मा (वय 27, नवी मुंबई)

आशा श्रीनिवास नायडू (वय 80, मुंबई भांडुप)

सुरेखा संतोष परब (वय 48, मुंबई भांडुप)

तीर्थ जितेंद्र ठाकूर (वय 18, मुंबई भांडुप)

प्रिया श्रीनिवास नायडू (वय 1 वर्ष, भांडुप)

योगिता सतीश नायडू (वय 38, मुंबई भांडुप)

सर्व जखमींना तातडीने यश मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे उपचार सुरू करण्यास मोठी मदत झाली. या तात्काळ मदतकार्याबद्दल स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button