
रत्नागिरी दि. ३० :- शुक्रवार दि. ०१ मे रोजी विठ्ठल मंदिर रत्नागिरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा पौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे.
उत्सवाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे :-
सकाळी ६:३० वाजता श्री स्वामींवर सामूहिक अभिषेक
सकाळी ७:३० वाजता श्री स्वामींची महाआरती
सकाळी ८ वाजता व त्यानंतर इच्छुक भक्तांना वैयक्तिक अभिषेक
दुपारी ११:३० वाजता श्री स्वामींना नैवेद्य अर्पण
दुपारी १२ वाजता महाआरती
दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद
सायंकाळी ४ वाजता भजन
सायंकाळी ७ वाजता श्री स्वामींची महाआरती
सायंकाळी ७:३० श्री स्वामी प्रसाद
“श्री स्वामी समर्थ” या नामस्मरणातच खरा समाधान आहे.
उद्या येणारा हा पवित्र दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो.
सर्व स्वामीभक्तांनी स्वामी दर्शनाचा आणि स्वामी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
|| श्री स्वामी समर्थ ||


