रत्नागिरी

हातखंबा बौद्धवाडी येथील अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

रत्नागिरी, दि. २६  : रत्नागिरी–देवरुख राज्य महामार्गावर रविवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोटरसायकलचा ताबा सुटून ती रस्त्यालगत असलेल्या कट्ट्याला आदळल्याने हा अपघात झाला.

या दुर्घटनेत हातखंबा बौद्धवाडी येथील सुमित विकास कांबळे (वय ३५) आणि विकास काशीराम कांबळे (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विकास चंद्रकांत कांबळे (वय ३८) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही देवरुख येथे लग्नसमारंभ आटोपून रत्नागिरीकडे परत येत असताना पांगरी परिसरात हा अपघात झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे हातखंबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button