रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश!

रत्नागिरी दि. १३ :- कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर व चेंजिंग रुम बांधण्यासाठी रु. ५ कोटी रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
भाट्ये, गणपतीपुळे, गणेशगुळे, गावखडी, वेळणेश्वर, मुरुड आणि लाडघर या समुद्रकिनाऱ्यांवर १३ इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर आणि १३ चेंजिंग रुम उभारण्यात येणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर व चेंजिंग रुम बांधण्यासाठी रु. ५ कोटी रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर कामांसाठी पहिल्या टप्यात प्रशासकीय मान्यतेच्या २० % प्रमाणात रु.१.०० कोटी इतका वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित निधीची मागणी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना मागणीप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे.


