रत्नागिरीराजकीय

राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प) पक्षाची आढावा बैठक १५ एप्रिलला देवरुखात

देवरुख दि. ११ (सुरेश सप्रे) :- रत्नागिरी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची जिल्हा आढावा बैठक बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वा. मराठा भवन, देवरुख ” येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीसाठी नवनियुक्त रत्नागिरी जिल्हा निरिक्षक विजयराव देसाई हे उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.

तरी, सर्व महिला जिल्हा अध्यक्ष, महिला जिल्हा कार्यकारणी, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व शहर अध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हा अध्यक्ष, प्रातीकचे सर्व सदस्य आणि जिल्हा कार्यकारणी सदस्यांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button