रत्नागिरी

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दामले विद्यालय शाळा क्रमांक १५ मध्ये वह्या वाटप कार्यक्रम

रत्नागिरी दि. २० : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडलाच्यावतीने रत्नागिरी नगरपरिषद दामले विद्यालय शाळा क्रमांक १५ या शाळेमध्ये भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजक केले गेले.. संपूर्ण पंधरा दिवस वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गोरगरिबांना मदत, विविध सामाजिक संस्थांना मदत, वैद्यकीय मदत कॅम्प, असे अनेक कार्यक्रम भारतीय जनता पार्टी रत्नागिरी च्या वतीने राबवले जात आहेत.

नगरपरिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय या शाळेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष दादा ढेकणे, सरचिटणीस निलेश आखाडे, प्रज्ञा टाकळे यांनी संयोजन म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रात कामगिरी केलेली विद्यार्थी यांना गौरविण्यात आले. व शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले.

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे यांनी आपले मत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या कामाचे कौतुक केले. व भाजपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

भाजपा सरचिटणीस निलेश आखाडे यांनी आपले मत व्यक्त करताना युती सरकारच्या माध्यमातून शाळेला नवीन इमारत मिळाली असून. शाळेसाठी इतर सोयी सुविधा प्राप्त होण्यासाठी व शाळेचा परिसर, आजूबाजूच्या परिसर सुशोभित करणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मला अभिमान असून शाळेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत हे पाहून आनंद वाटतो असे सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक श्री भगवान मोटे सर. यांनी भारतीय जनता पार्टी राबवत असलेल्या विविध कार्यक्रमाचे कौतुक करत सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत असते असते सांगत आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले, वर्षाताई ढेकणे- भाजप महिला जिल्हाध्यक्ष, दादा ढेकणे _ रत्नागिरी शहराध्यक्ष, निलेश आखाडे शहर सरचिटणीस, सरचिटणीस संदीप सुर्वे,सुप्रिया रसाळ – माजी नगरसेविका, नूपुरा मुळये – जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा, भक्ती दळी – जिल्हा सचिव, सोनाली आंबेकर – शहर कोषाध्यक्ष, प्रज्ञा टाकळे – कार्यकारिणी सदस्य मंदार खंडकर – युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष,सोनाली केसरकर, भक्ती दळी, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, सचिन गांधी, नरेंद्र कदम, संतोष सावंत , नितीन गांगण, प्रिती शिंदे, नुपुरा मुळ्ये, निशा आलीम,प्रसाद बाष्टे,नरेंद्र कदम,निशा अलीम,संतोष सावंत,मंदार भोळे, तुषार देसाई आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button