रत्नागिरीराजकीय

रत्नागिरीमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीचा एकतर्फी विजय

रत्नागिरी दि. ९ : तालुक्यातील १० जिल्हा परिषद गटात आणि २० पंचायत समिती गणात शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) महायुतीने एकतर्फी विजय मिळवत इतिहास रचला आहे.

मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच निकाल स्पष्ट झाले आणि शिवसेनेच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्र परिसरात एकच जल्लोष उसळला. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद आणि कार्यकर्त्यांच्या घोषणा यामुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला.

विजयी उमेदवार मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. या विजयामुळे तालुक्यात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, शिवसेनेच्या संघटनशक्तीचा आणि जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती.

रत्नागिरीत शिवसेना-भाजपा युतीचा विजयी गुलाल उधळत असतानाच, तालुक्याच्या राजकारणात नव्या उत्साहाची आणि आत्मविश्वासाची लाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button