रत्नागिरी

साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक; मोठा अनर्थ टळला

साखरपा दि. ३ :- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीजवळ गद्रे पेट्रोल पंपासमोर खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. मात्र मोठा अनर्थ टळला. सविस्तर मिळालेल्या माहिती नुसार गोविंद धोंडीराम साळुंखे वय ३५ राहणार लातूर हे आपल्या ताब्यातील प्रवासी ट्रॅव्हल्स एन एल ०१बी २४४२ ही गाडी पुणे येथून काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीस प्रवाशांना घेऊन पुणे ते रत्नागिरी असे घेऊन जात असताना आज पहाटे साडे तीन (३. ३०) वाजता संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर आली असता गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आली असता प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दैव बलत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

सर्व तीस प्रवाशी सुखरूप असून कोणतीही हानी नाही. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी नक्की कारण स्पष्ट झाले नाही.अग्नीक्षमन दलाच्या गाडीने आग विझवण्यात यश आले असले तरी आगीत गाडी पूर्णतः भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून प्रवाशांना सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button