“नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” कार्यक्रमाचे २७ रोजी आयोजन

रत्नागिरी दि. २५ : सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी आणि स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, पावस, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने “नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात श्री. मिलिंद तेंडुलकर हे नर्मदा परिक्रमेचे अनुभव कथन करणार आहेत. तसेच या अनुभवांवर आधारित संवाद प्रा. सौ. विस्मया कुळकर्णी साधणार आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
नर्मदा परिक्रमेचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक अनुभव जाणून घेण्याची ही एक अनोखी संधी असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सारस्वत स्नेहवर्धक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



