रत्नागिरी

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे बँक ऑडिट, ऑडिटिंग स्टँडर्ड्सवर कार्यशाळा

रत्नागिरी दि. २४ : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने बँक ऑडिट आणि स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे नुकताच उत्साहात झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बॅंक ऑफ इंडियाचे रत्नागिरीचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात स्टॅट्युटरी बँक ब्रांच ऑडिट करताना ऑडिटर्सकडून बँकेच्या अपेक्षा स्पष्ट केल्या. ऑडिटर्स हे बँकेचे विस्तारित हात आहेत, असे त्यांनी नमूद करत ऑडिटमधील जबाबदारी व पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात बँक ऑडिट विषयावर मार्गदर्शन करताना सीए निरंजन जोशी यांनी प्रॅक्टिकल अ‍ॅस्पेक्ट्स तसेच आयसीएआय कडून सदस्यांसाठी जारी करण्यात आलेल्या प्रॅक्टिकल युटिलिटीजची सविस्तर माहिती दिली. स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग या विषयावर सीए पराग प्रभुदेसाई यांनी ऑडिटिंग स्टँडर्ड्सचे पालन व आवश्यक डॉक्युमेंटेशन याबाबत सहभागी सदस्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांनी चालू वर्षाची संकल्पना इम्पॅक्टविषयी विचार मांडले व सदस्यांना व्यावसायिक कार्यात गुणवत्तापूर्ण व परिणामकारक कामगिरी करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सीए शैलेश काळे यांनी केले. शाखेचे खजिनदार सीए शरद वझे व सीए मंदार जोशी यांच्यासह इतर समिती सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सेमिनारला रत्नागिरी व परिसरातील चार्टर्ड अकाउंटंट्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button