रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींमधील १७५ रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक

रत्नागिरी, दि. २३ : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतीमधील १७४ रिक्त पदासाठी निवडणुका या निवडणूक कार्यक्रमामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका दि. 28 एप्रिल 2026 रोजी होणार आहेत.
ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका दि. 28 एप्रिल रोजी होणार आहेत, त्या ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असे उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.


