रत्नागिरी

हुतात्मा दिनाचे औचित्य साधून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाची सैनिक कल्याण निधीला मदत

'फटाके कमी वाजवा, सैनिक कल्याण निधीला मदत करा' उपक्रमातील निधी

संगमेश्वर दि. २३ ( प्रतिनिधी ):- आज हुतात्मा दिन. थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीवर बलिदान दिल्याचा पुण्यदिन.या थोर क्रांतिकारकांच्या तसेच देशाच्या हुतात्मा सुपुत्र सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि त्यांच्या प्रति श्रद्धांजली व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ दिवाळीमध्ये ‘फटाके कमी वाजवा, सैनिक कल्याण निधीला मदत करा’ असा उपक्रम राबवते. यावर्षी या उपक्रमांतर्गत आपल्या देशप्रेमी विद्यार्थ्यांनी रुपये ३०, ४५०/-(रुपये तीस हजार चारशे पन्नास) जमविले.

जमाविलेल्या रकमेचा धनादेश सैनिक कल्याण निधीच्या कॅनरा बँक येथील खात्यात आज २३ मार्च रोजी हुतात्म्यांचे पुण्यस्मरण करून भरण्यात आला असल्याची माहिती देवरुख शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली. हुतात्मा दिना निमित्त आज देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिरीष फाटक, आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांनी शहिद स्मारक येथे मानवंदना दिली. यावेळी कॅडेट, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button