रत्नागिरी

प्रांतपाल एम. जे. एफ. ला. डॉ. विरेंद्र चिखले यांची सावर्डे लायन्स क्लबला सदिच्छा भेट

संगमेश्वर दि. २१ ( प्रतिनिधी ):- सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजाप्रती कर्तव्यतून जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सेवा करणे हे आमच्या प्रत्येक लायन्स सभासदाचे प्रमुख ध्येय आहे. आमच्या अशा प्रकारच्या सेवेमुळे समाजातील सर्व थरातील लहान-मोठ्यांपासून आमच्यापर्यंत आशीर्वादाची सुखदृष्टी येतात. सतपात्री दान केल्याचे आम्हाला समाधान लाभते. कारण जेथे गरज आहे, तेथे जगातील २१० देशांमध्ये सुमारे १४ लाखांपेक्षा लायन्स सभासद सेवाकार्य करीत असतात.” याची प्रचिती सावर्डे लायन्स क्लबने केलेल्या विविध उपक्रमातून येते. असे गौरवोद्गार लायन्स क्लब लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट – ३२३४ डी – १ चे प्रांतपाल एम. जे. एफ. लायन्स डॉ. विरेंद्र चिखले यांनी सावर्डे लायन्स क्लबला दिलेल्या सदिच्छा भेटीच्या वेळी काढले.

या भेटीच्या वेळी चिपळूण तालुक्यातील कोसबी – फुरस विद्यालयाला सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर मशीन प्रांतपाल एम. जे. एफ. लायन्स डॉ. विरेंद्र चिखले यांच्या हस्ते मुख्याध्यापक कळंबे सर यांच्याकडे देण्यात आली.यावेळी सावर्डे लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रकाश राजेशिर्के, सेक्रेटरी ला. राजेश कोकाटे, खजिनदार ला. डॉ. अरुण पाटील, चेअरमन ला. डॉ. कृष्णकांत पाटील, क्लबचे माजी अध्यक्ष ला. गिरीश कोकाटे, ला. विजय राजेशिर्के, ला. सतीश सावर्डेकर आणि ला. डॉ. अमोल निकम, ला. समीर चिकटे, ला. सिताराम कदम, ला. मिलिंद टेटांबे, ला. मुग्धा निकम, ला. डॉ. दर्शना पाटील आदी बहुसंख्येने सर्व सभासद उपस्थित होते.

प्रांत भेटीच्या वेळी डिस्ट्रिक्ट खजिनदार ला. सांगोडकर आणि ला. विनया चिखले त्याचप्रमाणे कोसबी – फुरस विद्यालयाचे शिक्षक वृंदही उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली.

हा कार्यक्रम आगवे येथील सुहासिनी फार्म येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी सुहासिनी गार्डनचे उद्घाटनही श्रीमती सुहासिनी चंद्रकांत निकम यांच्या शुभहस्ते सर्व लायन्स सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आले.या सदिच्छा भेटीच्या वेळी क्लबचे अध्यक्ष ला. प्रकाश राजेशिर्के यांनी सावर्डे लायन्स क्लबच्या एकूण वाटचालीविषयी उपस्थितांना माहिती दिली. तर सेक्रेटरी ला. राजेश कोकाटे व खजिनदार ला. डॉ. अरुण पाटील यांनी अहवाल वाचन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रांतपाल एम. जे. एफ. ला. डॉ. विरेंद्र चिखले यांनी लायन्स मल्टिपलचे अध्यक्ष ला. प्रकाश राजेशिर्के, सेक्रेटरी ला. राजेश कोकाटे व खजिनदार ला. डॉ. अरुण पाटील यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी प्रांतपाल ला.विरेंद्र चिखले यांनी मार्गदर्शन केले आणि सावर्डे लायन्स क्लबच्या सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button