कळझोंडी धरण प्रकल्पास विद्यार्थ्यांची भेट, निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा घेतला आस्वाद

विल्ये दि. १७ :- रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी जि.प.आदर्श शाळा नं.१ या शाळेची शैक्षणिक निसर्ग सहल व वनभोजन कार्यक्रम जि.प. कळझोंडी धरण येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार जाधव गुरुजी, सहशिक्षिका गायत्री गाडे, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

कळझोंडी धरण येथील पाणी पातळी, गावांना होणारा पाणी पुरवठा,तेथील बाग बगीचा, कल्पवृक्ष बाग,कमल तळे, मुलांना खेळण्यासाठी असलेली घसरगुंडी, क्रिकेट गॅलरी अशा निसर्गरम्य परिसरात विद्यार्थी रममाण झालेले दिसले.यावेळी धरणाची व आजूबाजूच्या परिसराची माहिती कर्मचारी किशोर पवार यांनी दिली. चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण मिळावे यासाठी असे उपक्रम राबविले जातात, अशा उपक्रमातून विद्यार्थी मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसतात, मनसोक्त खेळतात सभोवताली निरीक्षण करताना दिसतात. त्यातूनच त्यांना नवनवीन कल्पना, प्रयोग सुचत असतात.आपल्या जन्म भूमीत असलेली लाल माती,निसर्ग रम्य वातावरणात खेळतात, नाचतात, धावतात,रम्य ते बालपण! या बालवयात घेतलेलं अनुभव उराशी बाळगून भावी जीवनात यशस्वीपणे वाटचाल करीत असतात. दुपारी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतात.अशा परिसरातील कितीतरी शाळांची मुले, पालक, ग्रामस्थ, पर्यटक कळझोँडी धरणाला सातत्याने भेट देऊन समाधान व्यक्त करतात.
या धरणामुळे कळझोंडी गावाला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.धरण कर्मचारी रविंद्र वीर, प्रशांत पवार यांचे उत्तम सहकार्य मिळाले त्या बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. विद्यार्थी वर्गाला माहिती दिली व आवश्यक सुचनाही केल्याव अतिशय शिस्तबद्ध मुलांची ही शैक्षणिक निसर्ग सहल व वन भोजन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.वविद्यार्थी,पालक,शिक्षक यांनी ही आनंद व्यक्त केला.



