रत्नागिरी

दोन तारखेला होणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून, ती सर्वांना ताकदीने लढणं गरजेचे

रत्नागिरीतील महायुतीच्या निर्धार मेळाव्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

रत्नागिरी दि. १९ :- दोन तारखेला होणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना ही अतिशय ताकदीने लढणं अत्यंत गरजेचे आहे आणि ती ताकदीने जर लढायची असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि कमळ हे प्रत्येकाच्या घरापर्यंत नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांनी येथे स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा महायुतीचा निर्धार मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला होता. या निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, राजेंद्र महाडिक, ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, वैभव खेडेकर, प्रशांत यादव, राहुल पंडित, बिपीन बंदरकर यांच्या सह महायुतीचे नगर परिषद, नगर पंचायतीचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, राजेश सावंत हे आता पार्टीचा कोणताही भाग नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याची स्टेटस बघण्याची गरज नाही. आता फक्त सध्या सचिन वहाळकर काय म्हणतात, दीपक पटवर्धन काय म्हणतात हे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काय दिलं आणि तुम्हाला किती मोठा सन्मान दिला हे कधीही त्यांनी विसरू नये. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्यामुळे कार्यकर्त्याला सन्मान देणं हे सातत्याने पार्टीने काम केले आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

आम्हाला सर्वांना युतीमध्येच निवडणूक लढायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता हा निर्णय आपला वरिष्ठानकडून घेतला गेलाय, त्यामुळे त्याच दिशेने जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी युतीच्या कार्यकर्त्यांच्या समोर उमेदवारी अर्ज भरले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्वप्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांचे अर्ज ते ताबडतोब मागे कसे घेता येतील, यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्रत्येक कार्यकर्त्यांनी युतीचाच उमेदवार मग तो नगरसेवकाचा असेल किंवा त्या ठिकाणचा असणारा नगराध्यक्ष पदाचा असेल या दोन्ही गोष्टी विजयाच्या दिशेने नेण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं हे अत्यंत गरजेचं आहे, असे प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button