रत्नागिरी

मालगुंड विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

प्रशालेच्या वतीने भव्य रॅली काढून केली संविधान बाबत जनजागृती

तरवळ दि. २६ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात व आनंदाच्या वातावरणात व भव्य रॅली काढून साजरा करण्यात आला.

प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज च्या वतीने संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेच वाचन करून करण्यात आली. त्या नंतर प्रशालेतील सहायक शिक्षक बाबासो बेडक्याळे यांनी भारतीय संविधान व त्याचे सर्व नागरिकांच्या मनात काय स्थान आहे, तसेच संविधानाने भारतीय जनतेला कोणते अधिकार आणि कर्तव्य दिलेली आहेत हे आवर्जून सांगितले.

भारतीय संविधान समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र हे सर्व अधिकारी संविधानाने भारतीय नागरिकांना दिले आहेत. हे सुद्धा आवर्जून सांगितले.कार्यक्रमानंतर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज च्या वतीने भारतीय संविधानाचा जागर करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मालगुंड शाळा ते मालगुंड ग्रामपंचायत अशी संविधानपर जनजागृती रॅली काढण्यात आली.

या संविधान दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये प्रशालेचे कला शिक्षक शाम पवार यांनी सुंदर संविधान गीत सादर केले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button