क्रीडारत्नागिरी

कबड्डीमध्ये पुण्याचे भैरवनाथ आणि पीटीबी संघ ठरले विजेते

‘डेरवण यूथ गेम्स २६’ मध्ये कबड्डीचा जबरदस्त थरार

संगमेश्वर दि. ७ ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्राच्या मातीमधील रांगडा खेळ अशी ओळख असलेल्या कबड्डीचा जबरदस्त थरार ‘डेरवण यूथ गेम्स २६’ मध्ये रंगलेला पाहायला मिळाला. पुण्याच्या कबड्डी संघांनी दोन विजेतेपद पटकाविली, तर कोल्हापूरच्या संघाने आणि सांगलीच्या संघाने प्रत्येकी एक विजेतेपद पटकावले.

एसव्हीजेसीटीच्या मैदानात कबड्डीचे एकूण १२७ सामने पार पडले. कबड्डीच्या सर्वच लढती अटीतटीच्या ठरल्या. १ ४ वर्षांखालील मुलांच्या गटात विश्वसेवा विद्या, सांगली हा संघाने बारामतीच्या एडीटी शारदा स्पोर्टस संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याच्या भैरवनाथ कबड्डी संघाने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू विद्यालय यांचा पराभव करीत विजेतपद पटकावले. १८ वर्षांखालील मुले गटात कोल्हापूरच्या अनिकेत फाऊंडेशन संघाने कोल्हापूरच्याच अण्णासाहेब डांगे संघाचा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. १८ वर्षांखालील मुली या गटात पुण्याच्या पीटीबी संघाने साताऱ्याच्या भैरवनाथ विद्यालय संघाचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.

१४ वर्षांखालील मुले या गटात सांगलीचा विराज बाळाज सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. तर याच वयोगटात सर्वोत्कृष्ट चढाई हे पारितोषिक बारामतीच्या अशरफ शेख याने पटकावले. तर सर्वोत्कृष्ट पकड हे पारितोषिक अवधूत सोडगेने मिळवले.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याच्या आराध्या दोडकरने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. सर्वोत्कृष्ट चढाई हा मान कोल्हापूरच्या सई निकमला तर सर्वोत्कृष्ट पकड हा मान पुण्याची ज्ञानेश्वरी बवलेने पटकावला.

१८ वर्षांखालील मुले या गटात कोल्हापूरच्या सर्वेश तेहेर हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. तर सर्वोत्कृष्ट चढाईचा मान कोल्हापूरच्या समर्थ रानगेने, तर सर्वोत्कृष्ट पकड हा मानही कोल्हापूरच्याच मंथन सावंतने पटकावला. १८ वर्षांखालील मुली या गटात पुण्याची समृद्धी मुगुरकर सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. तर सर्वोत्कृष्ट चढाईचा मान भैरवी इंगवले या खेळाडूने तर सर्वोत्कृष्ट पकड हा मान पुण्याची माधवी जाधवने पटकावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button