रत्नागिरी

सहकार कार्यकर्त्यांसाठी जिल्हा बॅंकेतर्फे ३१ पासून मांडकी येथे निवासी प्रशिक्षण शिबिर

रत्नागिरी दि. २३ जुलै : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड तर्फे ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत मांडकी येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था येथे तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांना सहकार क्षेत्रातील कायदे, वित्तीय व्यवस्थापन आणि संस्थांच्या प्रभावी कारभाराची माहिती मिळावी, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

सध्या स्पर्धात्मक युगात सहकारी संस्थासक्षमपणे चालवण्यासाठी सहकारी कायदा, वित्तीय व्यवस्थापन, संचालक मंडळाची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि लेखापरीक्षण यांसारख्या विषयांचे ज्ञान आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन बँकेच्या सभासद संस्थांमधील पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी आपल्या तालुक्यातील बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाशी किंवा रत्नागिरी येथील प्रधान कार्यालयातील प्रशासन विभागाशी संपर्क साधून २८ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत.

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button