रत्नागिरी

जाणीव फाऊंडेशनच्या कौशल्य विकास उपक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य

रत्नागिरी दि. २६ : रक्तदान, रक्तदात्यांची सूची आणि विविध उपक्रमांद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेने आता रत्नागिरीतील एक हजारांहून अधिक तरुण आणि महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहकार्य करून शुभेच्छा दिल्या. जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी श्री. चव्हाण यांची भेट घेऊन विशेष आभार मानले.

रत्नागिरी येथील जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील युवक, महिलांसाठी कौशल्याधारित रोजगार निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रशिक्षण, बेसिक कॉम्प्युटर, टॅली अकाऊंटिंग, कोरल डिझाईन, फूड मधील रेडी टू कुक अशा एकूण ५०० हून अधिक लाभार्थ्यांना उच्च दर्जाच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

जाणीव फाउंडेशनचे सामाजिक कार्य पाहून आणि एआयच्या युगात रत्नागिरीतील महिला, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळावे याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे जाणीव फाउंडेशनच्या वतीने कौशल्य विकास उपक्रम सुरू होत आहे. यापूर्वी जाणीव फाउंडेशनने रक्तदात्यांची सूची, रक्तदान, गाव दत्तक घेऊन तिथे विकासकार्य, गावातील अंगणवाडी दर्जेदार बनवणे असे अनेक उपक्रम राबवले आहेत. आता कौशल्य विकास उपक्रमामुळे महिला, तरुणांना फायदा होणार आहे. कौशल्य विकास उपक्रमात जास्तीत महिला, तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button