रत्नागिरी तालुक्यातील बोंडे येथे २ रोजी श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

तरवळ दि. १ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील बोंडे चौथाईवाडी येथे गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून संपन्न होणार आहे.
श्री हनुमान मित्र मंडळ बोंडे चौथाईवाडी यांच्या वतीने श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्या साठी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, सकाळी ५-३० वाजता श्री हनुमान जन्मकाळ, सकाळी ८ वाजता आरती व भोवत्या, सायंकाळी ९ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, रात्री ८ वाजता आरती व भोवत्या, रात्री ९ -३० वाजता मान्यवर व्यक्तींचा सत्कार आणि रात्री १० वाजता श्री कालकाई देवी नमन मंडळ वाटद यांचे कोकण चे बहुरंगी नमन हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
श्री हनुमान जयंती जन्मोत्सवाला सर्व भाविकांनी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मित्र मंडळ बोंडे चौथाईवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.



