खारवी समाज परिवर्तन मंच पूर्णगडतर्फे शिवजयंती थाटात साजरी

रत्नागिरी दि. २० :- सालाबादप्रमाणे खारवी समाज परिवर्तन मंच पूर्णगड याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रथम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन नवनिर्वाचित पंचायत सदस्या सौ स्वाती शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्मिता भिवंदे यांनी केले. यावेळी पूर्णगड सागरी ग्रामिण पोलीसचे श्री. शिवगण, परिवर्तन मंचचे अध्यक्ष श्री. राजाराम नाटेकर, श्री. वासुदेव वाघे, ग्रा प सदस्या सौ. आचल हरचकर, श्रीमती प्रणिता हरचकर, श्री राकेश हरचकर, श्री. कातळकर गुरुजी, पो पाटिल श्री. पाथरे, शिवप्रेमी श्री. रामचंद्र हरचकर, गावडेआबेरेचे समाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश डोर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जय भवानी– जय शिवाजी —-हर- हर -महादेव घोषणा देवून पूर्णगड किल्ला गजबजून गेला. केद्रिय शाळेच्या विद्यार्थीनी कु. नार्वेकर, कु. खडपे तसेच श्री. रामचद्र हरचकर यानी छत्रपती शिवाजी महाराजाच्या वाटचालीची मनोगत व्यक्त करुन सर्वांची मने जिकंली. माझ्या कार्याची सुरूवात आज या शुभदिनी कार्यक्रमाच्या निमित्ताने करत असून केव्हाही हाक मारा आपणास साथ नक्कीच देईन, असे भावनिक उद्गगार सौ. स्वाती शिंदे यानी काढले यावेळी केद्रिय शाळा पूर्णगड, मराठी शाळा खारवीवाडा या शाळेतील शिक्षकवृद विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. बबन आडविरकर, श्री. विजय आडविरकर, श्री. निळकंठ नाटेकर, श्री. सागर नाटेकर, श्री. रविंद्र डोर्लेकर, श्री. मनोहर डोर्लेकर, श्री. जनार्दन डोर्लेकर आदी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.



