रत्नागिरी

ज्येष्ठांचा सन्मान हीच समाजाची शान; मिठगवाणे येथे वाढदिवस सत्कार सोहळा

मिठगवाणे दि. २० :- राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील बौद्धवाडी सांस्कृतिक केंद्रात माहे फेब्रुवारी 2026 मधील ज्येष्ठ नागरिक सभासदांचा वाढदिवस शुभेच्छा व सत्कार कार्यक्रम गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवजयंती दिनाचे औचित्य साधून सकाळी 10 वाजता उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सत्कारमूर्ती म्हणून प्रकाश जैतापकर, मधुकर धनावडे, विद्याधर गडगेकर, रंजना रमाकांत पावसकर आणि प्रभावती रामदास बाणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

समाजात ज्येष्ठ नागरिकांचे स्थान अत्यंत मानाचे असून त्यांच्या अनुभव, मार्गदर्शन आणि आयुष्यभराच्या योगदानाची कदर करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे ज्येष्ठांना आपुलकीची जाणीव होते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजातील पिढ्यांमधील संवाद अधिक दृढ होतो, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

विशेष म्हणजे सागरी पोलीस ठाणे वतीने ‘मिशन प्रतिसाद’ अंतर्गत तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून संबंधित ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत केले.

कार्यक्रमास सागरी पोलीस ठाणे नाटे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाटे येथील व्यावसायिक संदेश पाथरे व दुष्यंत पाथरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष विलास चेऊलकर, सचिव रमेश राणे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button