रत्नागिरी

सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे आज आणि उद्या होणार दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणांकरिता तपासणी शिबीर

रत्नागिरी दि. १९ :- भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम,महानगर गॅस लिमिटेड,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व MGL यांच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पातून रत्नागिरी जिल्ह्यामधील दिव्यांगांकरिता मोफत सहाय्यक उपकरणे वितरण करण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन.

पात्र दिव्यांग प्रवर्ग पुढील प्रमाणे राहील:- 1. अस्थिव्यंग, 2. बहुविकलांग, 3. सेरेब्रल पाल्सी, 4. कर्णबधीर, 5. अंध (90% वरील), 6.कुष्ठ रोग निवारीत.

बौद्धिक अक्षम(मतिमंद) दिव्यांगांची या शिबिरात कोणतीही तपासणी होणार नाही.

दिव्यांगांचे पात्रता निकष

1) UDID कार्ड 40% वरील.

2) आधार कार्ड.

3) रेशन कार्ड – वार्षिक उत्पन्न 2 लाख 70 हजार च्या खाली नोंद असलेले किंवा संजय गांधी निराधार पेन्शन पत्र किंवा माननीय खासदार किंवा आमदार किंवा सरपंच किंवा नगरसेवक यांचा उत्पन्न दाखला.

4) मागील 3 वर्षात लाभार्थीने अलिम्कोकडून त्याच प्रकारच्या उपकरणाचा लाभ घेतलेला नसावा.

5) बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल व स्मार्टफोनचा लाभ मागील पाच वर्षात घेतलेला नसावा.

6) बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल करिता अस्थीव्यंग प्रकारातील 60 %वरील व कमरेखाली दिव्यांग असलेले परंतु दोन्ही हात कार्यक्षम असलेले दिव्यांग पात्र ठरतील

पात्र दिव्यांगांना मिळणारे साहित्य:- या शिबिरामध्ये तपासणी नुसार व्हील चेअर, कुबड्या, एलबोक्रचेस, वॉकिंग स्टिक, श्रवण यंत्र, स्मार्टफोन, ब्रेल किट, सी. पी. चेअर, बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल, ADL किट इत्यादी सहाय्यक उपकरणे. इत्यादी साहित्य दिव्यांगांसाठी प्रस्तावित केली जातील.

शिबिराचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.

स्थळ:- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी इमारत, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी.

गुरुवार दि.19/02/2026 व शुक्रवार दि.20/02/2026 रोजी

*वेळ:-* 10:00 ते 04:00

*प्रकार:-* 40% वरील प्रमाणित दिव्यांग.

दिव्यांगांना आवाहन करण्यात येत आहे कि सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

अधिक माहिती साठी संपर्क – जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी 9834440200

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button