रत्नागिरीतील युवा स्पोर्टसचे मालक, टेनिस क्रिकेटपटू प्रवीण पवार यांचा मैदानात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

रत्नागिरी दि. ६ : येथील युवा स्पोर्टसचे मालक तथा रत्नागिरी टेनिस क्रिकेट क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व प्रवीण पवार यांचे शुक्रवारी ७ फेब्रुवारी रोजी निधन झाले. चिंचखरी येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
मैदानावरच ते कोसळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
प्रवीण पवार यांच्या अकाली निधनाने रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे ते खेळाडू, संघटक आणि क्रीडाप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने क्रिकेट क्षेत्राची मोठी हानी झाली असून सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. दिवंगत आत्म्यास शांती लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली क्रीडाप्रेमींनी अर्पण केली आहे.



