रत्नागिरी

दहावी व बारावी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी, दि. ६ :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहेत. परीक्षा कालावधीत परीक्षेच्या दिवशी 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 रोजी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.

इयत्ता दहावी लेखी परीक्षा जिल्ह्यातील एकूण 73 परीक्षा केंद्रावर व इयत्ता बारावीची लेखी परीक्षा जिल्ह्यातील एकूण 38 परीक्षा केंद्रावर 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 रोजी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. सोबत परीक्षा केंद्राची यादी जोडली आहे. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button