
रत्नागिरी दि. ४ :- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने व तायक्वांदो संघ रत्नागिरी आयोजित१९ वी जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धा दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे खेळाडू मोठ्या आत्मविश्वासाने सहभागी होत असून क्लबकडून संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सुमारे ६५० हून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही स्पर्धा पूमसे व क्युरोगी या प्रकारात घेण्यात येणार असून, ७, १२, १४, १८ वर्षांखालील तसेच १८ वर्षांवरील अशा विविध वयोगटांमध्ये सामने रंगणार आहेत. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांनी गौरविण्यात येणार असून, पदकांच्या संख्येनुसार सांघिक प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
तसेच स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून पी वी वयोगटासाठी समर्था बने देवनसुपल सब ज्युनिअर वयोगटासाठी सुजल सोलंके श्रुती चव्हाण कॅडेट वयोगटासाठी वेदांत चव्हाण पार्थ गावडे ज्युनिअर वयोगटासाठी अमेय सावंत सीनियर वयोगटासाठी निखिल पवार यांचे नावे संघ प्रशिक्षक म्हणून जाहीर करण्यात आली आहे
या निमित्ताने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, व एस. आर. के. तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी तसेच समस्त पालकवर्ग यांनी सर्व खेळाडूंना यशस्वी कामगिरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



