श्री शिवशंभु मित्र मंडळ छत्रपती नगर येथे साकारली विजयदुर्ग किल्ला प्रतिकृती

रत्नागिरी दि. २५ :- श्री शिवशंभु मित्र मंडळ छत्रपती नगर साळवी स्टॉप येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विजयदुर्ग किल्ला प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
या किल्ल्यावर जीवीचा दरवाजा, गोमुखी दरवाजा, सदर दारू कोठार, हनुमान मंदिर, जखीणीची तोफ, जखिंण मंदिर, माडी, खलबतखाना, बारा तोफ,बुरुज सदाशिव बुरुज, गोविंद बुरुज, मनोरंजन बुरुज, गगन बुरुज, शिवाजी बुरुज, व्यंकट बुरुज, शहा बुरुज, शिंदे सिकंवरा बुरुज, तुटका बुरुज, दर्या बुरुज, सर्जा बुरुज, राम बुरुज, माडी बुरुज, घनची बुरुज, हनुमान मंदिर, शिवरायांची मूर्ती अशी सजावट करण्यात आली आहे.
किल्ल्याचे काम पंधरा दिवस चालू होते. हा किल्ला साकारण्यासाठी शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, आर्यन चव्हाण, रुचिग मूडे, सुधीर मावडि, आदेश शेलार, तनिष रेडीज, अनिल बावडेकर, सिद्धू भोरे, श्रीयोग चव्हाण, अखिलेश बांबाडे, वैभव पांचाळ, अजय रेडीज, गौरव सावंत, निखिल सावंत, प्रसाद सावंत, अभिजीत गिरकर, अथर्व वरे, नेहा सावंत, ऋषी दुधाने, अंशिका शिंदे, शिवांगी चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, राजस वने अद्वैत रासकर, यश सुर्वे, श्रेयस झगडे, शुभम मावडी. ऋत्विज पेडणेकर, वेदांत सावंत यांनी किल्ला साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
या किल्ल्याची लांबी तीस फूट लांब 15 फूट रुंद चार फूट उंची आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे किल्ला पाहण्याची वेळ सायंकाळी सहा ते रात्र अकरा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. किल्ला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
या किल्ल्याचा शुभारंभ श्री. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पत्रकार राजेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सौरभ शेठ मलुष्ठे, योगेश विरकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला



