रत्नागिरी

उबाठा’ पावसचे माजी उपविभाग प्रमुख निलेश गजने यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

रत्नागिरी दि. १ :- येथील उबाठा गटाचे पावसचे युवा उपविभाग प्रमुख निलेश गजने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी उपस्थित होते.

उबाठा गटाचे स्थानिक पातळीवरील निर्णय न पटल्याने निलेश गजने यांनी उबाठाच्या युवा उपशाखा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह धनुष्य बाण हातात घेतले. पक्ष सोडणा-यांपेक्षा पक्षात राहून पक्षविरोधी काम करणारे अधिक घातक असतात अशी आपली स्पष्ट भूमिका मांडून उबाठाचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसंदर्भातील स्थानिक पातळीवरील निर्णय न पटल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांचे सोबत मावळंगे व परिसरातील विशाल शिंदे, प्रसाद लाड,योगेश वारीशे, राहुल नाडणकर, प्रथमेश वारीशे, संकेत गजने, सुयोग वारीशे, योगेश शिंदे, राज गजने, मयुर गजने, राजन बोल्ये, प्रसाद गजने, संतोष गजने,प्रसाद बोल्ये, चैतन्य गजने, देवेंद्र गजने,अभिषेक बिर्जे,प्रकाश पारकर, दुर्गेश बोल्ये, सर्वेश बोल्ये,तेजस गजने, प्रथमेश गजने, गणेश गजने, गणेश बोल्ये, रत्नदीप गोठणकर, संदीप थुळ, गौरव शिंदे, स्वप्नील लाखन, मंगेश वारीशे आदींनी पक्षप्रवेश केला.

यावेळी उपतालुकाप्रमुख बंधू वारीशे, पावस ग्रामपंचायत सरपंच सौ. सामंत तसेच गोळप येथील शाखाप्रमुख राजेश पावसकर, महेश भाटकर, संदिप पावसकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button