रत्नागिरी

७७ वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद मराठी शाळा पन्हळी येथे संपन्न

खंडाळा दि. २७ :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व देखणी अशी संगीत कवायत सादर केली. पुढे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

या बक्षीस वितरणासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या बक्षीसदात्यांची नावे व त्यांनी दिलेले साहित्य पुढीलप्रमाणे- सौ. अश्विनी बैकर मॅडम : पाणी बॉटल व विद्यार्थ्यांसाठी खाऊ, श्री उदयभाऊ महाकाळ : पट्टी, पेन, पेन्सिल, खोड, रबर, शार्पनर तसेच शिक्षकांसाठी पेन श्री प्रणवदादा बैकर व कु. सावी प्रसाद पाष्टे : पट्टी, पेन, पेन्सिल, खोड, रबर, शार्पनर, इंग्लिश व मॅथ विषयांची ॲक्टिव्हिटी पुस्तके तसेच अंगणवाडीसाठी पाटी व खडू बॉक्स, श्री महेशभाऊ महाकाळ : पेन व चॉकलेट पॅकेट, तसेच उपस्थित सर्वांना मोतीचूर लाडूंचे वाटप श्री प्रदीपदादा खापले यांनी केले.

याशिवाय उपस्थित सर्वांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यासाठी सौ. प्राजक्ता गोताड, सौ. प्रतीक्षा ठीक, सौ. सुप्रिया किंजळे, सौ. वृशाली पास्टे तसेच ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी यांनी मोलाचे सहकार्य केले.

या सर्व दात्यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात बक्षीस मिळवण्यासाठी नवीन जिद्द व जिज्ञासा निर्माण होऊन, त्यांच्यात सृजनशीलता वाढण्यास व नवीन काहीतरी शिकण्यास प्रेरणा मिळते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भर पडून त्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होत आहे.

या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पालक व ग्रामस्थांचे आम्ही शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग, खूप खूप आभारी आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button