महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध

सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणेंची ‘धुरंधर’ राजनिती

सिंधुदुर्ग दि. २४ :- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोठा धमाका केला असून जिल्हा परिषदेच्या ५ तर पंचायत समितीच्या ६ जागांवर भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सिंधुदुर्गच्या राजकारणात राणेच धुरंधर असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलय.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महायुतीचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार- 

१) खारेपाटण – प्राची इस्वलकर(भाजप)

2)जाणवली – सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट)

3)पडेल – श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)

४)बापर्डे – सौ.अवनी अमोल तेली (भाजप)

५)बांदा – उमेदवार श्री. प्रमोद कामत (भाजप)

कणकवली तालुका पंचायत समिती महायुती ( बिनविरोध)

१)बिडवाडी – सौ.संजना संतोष राणे (भाजप )

2)वरवडे – श्री.सोनू सावंत (भाजपा)

देवगड तालुका पंचायत समिती- 

१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)

२)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)

३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)

वैभववाडी तालुका पंचायत समिती- 

१)कोकिसरे – सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button