लांजातील ७० वर्षीय वृद्धेचे घरकुल संमतीसाठीचे उपोषण स्थगित

रत्नागिरी दि. २४ :- लांजा तालुक्यातील वेरवली गावच्या निराधार वृद्ध महिलेने पुकारलेल्या आंदोलनाची प्रसासनाने तिच्या घरी दखल घेतल्याने अखेर प्रशासकीय शब्दाखातर मिळालेल्या आश्वासनानंतर प्रजासत्ताक दिनी इशारा दिलेले उपोषण स्थगित केले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, वेरवली गावच्या दीपाली दीपक डोळस वय वर्षे ७० यांनी बांधलेल्या घरकुलासाठी तिचे जवळच्या नातेवाईकांनी संमती न दिल्याने घरकुलाचे सर्व पुढील हप्ते प्रशासनाकडून थांबविण्यात आल्याने तसेच धमक्या, छळ होतं असल्याने थेट लांजा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रारी दाखल केल्या होत्या.
या सगळ्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे कार्यतत्पर उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. सागर पाटील, गटविकास अधिकारी इंदूराव गिरी यांच्या सूचनेनुसार लांजा पंचायत समितीचें ग्रामविस्तार अधिकारी संजय कुंभार, व वेरवली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी तेजस वडवळकर, सरपंच वेदा कोळवणकर यांनी शुक्रवारी थेट सदर महिलेच्या घर गाठले आणि उपोषणास बसण्यापासून परावृत केले. घरकुल घरासाठी संमती तसेच घरकुलाचे पुढील संभाव्य हप्ते देण्याबाबत सदर वृद्धेला विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचा निर्णय दिला. प्रशासन अधिकारी रमेश भगवान कुरणे यांनी या कामी घेतलेली प्रशाकिय भूमिका व प्रशासनाने केलेल्या विनंतीचा मान राखून उपोषण तूर्त स्थागित करत असल्याची माहिती लेखी स्वरूपात सदर महिलेच्या घरी आलेल्या प्रशासकीय अधिकऱ्यांना दिली. न्यायोचित भूमिका घेऊन न्याय दिल्याने या निराधार महिलेने प्रशासनाचे विशेष आभार मानले.



