
देवरूख दि. २१ (सुरेश सप्रे) :- संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिप गटात शिवसेना- भाजपा – राष्ट्रवादी (अजित पवार ) आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे युवानेते व माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांनी कोसुंब गटातुन जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
यावेळी माजी आमदार सुभाष बने, बाळकृष्ण बने, जिल्हा संपर्कप्रमुख राजु महाडीक, विलास चाळके, बापू शेट्ये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी साडवली येथील रत्नसिंधु निवासस्थान ते तहसीलदार कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..



