रत्नागिरी

प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत मुकादम यांचे निधन

रत्नागिरी दि. १८ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका संघचालक आणि प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत अनंत मुकादम (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

सामान्य स्वयंसेवकांपासून सुरवात करून ते तालुका संघचालक म्हणूनही कार्यरत होते. १९७५ मध्ये भारतावर लादलेल्या आणीबाणीत मुकादम यांनी तुरुंगवास भोगला. १९९२ मध्ये अयोध्या येथे श्रीराम मंदिर करसेवेत भाग घेतला. संघाचे द्वितीय संघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांचे मूळगावी गोळवली येथे स्मारक करण्यासाठी राष्ट्रीय सेवा समिती या संस्थेकडे दायित्व आले. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून मुकादम यांनी जबाबदारी पार पाडली.

पटवर्धन हायस्कूल येथे शिकताना शाळेच्या कलाविहार मंडळाकडून नाटकांमध्ये स्त्री भूमिकाही केल्या. दहावीच्या परीक्षेनंतर नाटकाचा छंद विविध मंडळातून काम करून जोपासला जात असताना देवर्षी नाट्य मंडळ सुरू करून २० वर्षे आपल्या खेडेगावात उत्सवाला नाटके केली. १९५८ मध्ये अ. भा. देवरूखे ब्राह्मण संमेलन फुणगूस गावी झाले. त्यामध्ये सहकार्यवाह म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, जावई असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button