रत्नागिरी

श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊड विद्यालयाचा शनिवारी रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळा

रत्नागिरी दि. १५ :- करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था करजुवे तालुका संगमेश्वर संचलित श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊड तालुका रत्नागिरी या विद्यालयाला २५ वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळा शनिवार दि. १७ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य श्री. शशिकांत नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. निरंजन डावखरे, चिपळूण संगमेश्वर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. दीपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार, जिल्हा क्रीडाअधिकारी श्री. विजय शिंदे, पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक तसेच परिसरातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक सहकारी वर्ग त्याचबरोबर देऊड गावातील सल्लागार समितीचे सर्व सदस्य, शालेय समिती सदस्य तसेच श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ, देऊड मधील ग्रामस्थ त्याचबरोबर आजी-माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ सत्रामध्ये उद्घाटन व स्मरणिका प्रकाशन त्याचबरोबर देणगीदार, मान्यवर व गुणवंतांचा सत्कार सत्कार सोहळा व सायंकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ व सांस्कृतिक कलामंच निर्मित दोन अंकी सामाजिक नाटक ‘अति पण किती ‘ हा नाट्य प्रयोग होणार आहे तरी या दिमाखदार व संस्मरणिय कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीशैल्य पुजारी सर व गौरव समितीचे अध्यक्ष व गावचे सरपंच श्री संजय दादा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button