रत्नागिरी

कळझोंडी नं.१ येथील आदर्श शाळेमध्ये विविध प्रबोधनी लक्षवेधी कलेतून स्नेहसंमेलन संपन्न

विल्ये दि. १८ :- रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कळझोंडी नं. १ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त मुलांचे विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधनात्मक कला कौशल्याचे प्रदर्शन करीत उत्तम प्रकारे सादरीकरणाने पार पडले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी सरपंच दीप्ती वीर, माजी उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पवार, माजी अध्यक्ष महादेव आग्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – संजय पवार, उपाध्यक्षा- सौ. बेनेरे ,पंचायत समिती – माजी सभापती मेघना पाष्टे, अंगणवाडी सेविका- शुभदा महाडिक, मुख्याध्यापक- राजकुमार जाधव , शिक्षिका गायत्री गाडे, गावातील ग्रामस्थ- दीपक शिंदे, विनायक शिंदे ,यशवंत निंबरे, शत्रुघ्न चौगुले, कळझोंडी आरोग्य उपकेंद्राच्या सी. एच .ओ. शिरसेकर, आशा सेविका साक्षी पवार, पाणी पुरवठा कर्मचारी सुभाष पवार, किशोर पवार, पांडुरंग सनगरे, संजय शितप, महिला मंडळ अध्यक्षा नलिनी पवार, अंजली शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी केले. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या मुलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा प्रारंभ श्री गणेश पूजन गीताने करण्यात आला.त्यानंतर पर्यावरण रक्षण,शेतकरी नृत्य, वृक्षारोपण ,मोबाईलचे दुष्परिणाम ,कोळीगीते ,राष्ट्रीय एकात्मता,देशभक्तीपर गीते तसेच महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,माता रमाई,सावित्रीमाई फुले यांच्या मानवी मूल्य व सामाजिक एकात्मता यांचे जीवन कार्यावर क्रांती गीते सादर करण्यात आली.

अतिशय मनोवेधक आणि प्रबोधनात्मक असे प्रभावी कार्यक्रम मुख्याध्यापक राजकुमार जाधव व सहकारी शिक्षिका गायत्री गाडे यांच्या अथक परिश्रमाने उत्तम प्रकारे सादरीकरणाने पार पडले.सालाबाद प्रमाणे यावर्षीही

मुलांना रंगभूषा व वेशभूषा करण्यासाठी प्रसाद लिंगायत व संदीप बेनेरे यांचं मोलाचं सहकार्य लाभले.रंगमंच व्यवस्था सहावाडीचे ग्रामस्थ व महिला,पालक, शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.स्टेज पडदे व्यवस्था कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आली.सर्वांचे स्वागत,सुत्रसंचलन, आभार सहशिक्षिका सौ.गायत्री गाडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button