रत्नागिरीसामाजिक

लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे १४ ते १९ जानेवारी या कालावधीत ‘लायन्स महोत्सव – फॅमिली फन फेअर २०२६’चे आयोजन

रत्नागिरी दि. ८ :- लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे दिनांक १४ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत लायन्स महोत्सव फॅमिली फनफेअर २०२६ औद्योगिक, कन्झ्युमर आणि फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

लायन्स क्लब रत्नागिरी गेल्या 52 वर्षांपासून शैक्षणिक आरोग्य क्रीडा संस्कृती व पर्यावरण अशा विविध क्षेत्रात समाज उपयोगी उपक्रम राबवून रत्नागिरी परिसरात आपला ठसा उमटवत आहे. लायन्स सदस्य आणि रत्नागिरीतील अनेक दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळे 1998 या रोप्य महोत्सवी वर्षात एमआयडीसी परिसरात लाइन्स ची भव्य वास्तू उभारण्याची स्वप्न साकार करण्यात आले. या वास्तूमध्ये पाळणाघर, वैद्यकीय सेवा केंद्र, मधुमेह निदान केंद्र, डायलिसिस सेवा इत्यादी प्रकल्प राबविले जातात. अंधत्व निवारण हे लायन्सचे प्रमुख सेवा कार्य असून त्याच अनुषंगाने लायन्सच्या स्वतःच्या इमारतीत अद्ययावत नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.

आजपर्यंत 40 हजाराहून अधिक नेत्र शास्त्रक्रिया व दोन लाख पेक्षा जास्त मोफत नेत्र तपासण्या येथे करण्यात आले आहे. गावोगावी राबविण्यात येणाऱ्या मोफत मोतीबिंदू शोधू मोहिमा व शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची अत्यंत आवश्यकता भासत असते आणि म्हणूनच यावर्षी लायन्स क्लब रत्नागिरीच्या माध्यमातून लायन्स महोत्सव 2024 औद्योगिक, कंज्यूमर आणि फुड फेस्टिवल या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला प्रमुख प्रायोजकत्व म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

या महोत्सवात शेती, औद्योगिक उत्पादने, दुचाकी चार चाकी वाहने, माहिती तंत्रज्ञान, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फॅशन डिझाईन कोकणातील व इतर भागातील नवनिर्मित उत्पादने तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. त्या सोबतच व्हेज, नॉनव्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल अशा भव्य फूड फेस्टिवलचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

सर्व वयोगटांसाठी फनी गेम्स, अम्युजमेंट पार्क, नृत्य कार्यक्रम, क्वीज दररोज लकी ड्रॉ व आकर्षक बक्षीस असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आकर्षाने या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. कुटुंबासह आनंद लुटता येईल असे हा कार्यक्रम रत्नागिरी साठी विशेष आकर्षण ठरेल. या महोत्सवातून मिळणारा निधी लाईन्स आय हॉस्पिटल व लायन्स क्लब रत्नागिरीच्या समाजोपयोगी सेवा कार्यासाठी वापरण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ओमकार फडके, पराग पानवलकर, संजय पटवर्धन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात गुरुवारी दि. ८ जानेवारी रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेला लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चे अध्यक्ष संजय पटवर्धन, लाईन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर सौ. श्रेया केळकर, गणेश धुरी, ट्रेझरर मनोज सावंत, सेक्रेटरी शरद नागवेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button