भाजपाच्या तालुका मध्य मंडल महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी दि. ८ :- भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात तालुका मध्य मंडल महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ताई ढेकणे यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी तयार करून ती जाहीर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष सौ. सुचिता नाचणकर यांच्या नियोजनातून व सहकार्याने ही कार्यकारिणी करून सर्व नवीन पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्ती पत्र देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ताई ढेकणे यांनी सर्व महिलाना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस नुपुरा मुळये यांनी महिलाना शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
तालुकाध्यक्ष सौ. सूचिता नाचणकर, उपाध्यक्ष सौ. सायली रवींद्र केतकर, सरचिटणीस सौ. शिवानी दिनेश रेमुळकर, सचिव सौ मेधा संजय देवस्थळी, सहसचिव सौ. अनुष्का शेलार, कोषाध्यक्ष सौ. संपना महेंद्र सावंत व सदस्य सौ. मंजिरी मंगेश चव्हाण, सौ. शुभांगी सुभाष घाणेकर, सौ. कींजळ अभय लिंगायत, सौ. कीर्ती मंगेश मोडक, धनश्री सुरेन्द्र देसाई , सौ. नेत्रा नितीन करंदीकर, सौ. नम्रता नितीन इंगावले व सौ. वैभवी विनोद पालेकर.
या नवीन कार्यकारिणीतील सर्व महिलानी एकत्र येवून जोमाने काम करू असे जिल्हाध्यक्षकांना सांगितले तसेच दिलेल्या पदाला योग्य तो न्याय देवून भारतीय जनता पार्टी चे काम वाढवू व पक्ष वाढविण्यास मदत करू असे आश्वासन दिले.

