रत्नागिरी

नेहरू सेंटर मध्ये शिल्पकलेतील कलाकार दांपत्याचे पंचधातुतील शिल्पांचे प्रदर्शन!

१० फेब्रुवारीपासून प्रारंभ

संगमेश्वर दि. ९ ( प्रतिनिधी ):- भारतीयकला परंपरेतील चौसष्ठ कला व सहा ललीत कला परंपरेतील मध्ये शिलाकलेला मोठे स्थान आहे. याच शिल्प कलेत आपलं करिअर करण्याच्या ध्यासाने एक आपल्या कोकणाच्या नांबड्या मातीतील सावर्डे गावचा तरुण सध्या देशपातळीवर नावारूपाला येत आहे. किरण किसन शिगवण आपल्या नावा प्रमाणेच बाल पणापासूनच कोकणातील लाल माती, शाडू मातीत त्यांची बोट कमाल दाखवू लागली आणि गावातील थोरामोठ्यांच्या कौतुकाने त्यांची शिल्पकला आणखीनच बहरली आणि आई बाबांच्या स्वप्नांचा आशेचा किरण शिल्पमय झाला. याच कलाकाराने आपली पत्नी करुणाच्या शिल्प कलाकृतीसह एक अप्रतिम असं प्रदर्शन मुंबईत १० फेब्रुवारी पासून नेहरू सेंटर येथे भरवले असून ते १६ फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. कलारसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी आणि शिल्पाकृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध शिल्पकार किरण शिगवण यांनी केले आहे.

सध्या शिल्पकार किरण शिगवण हे नालासोपारा येथे स्थायीक आहेत. कलाकार विभागात त्यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीचे शिल्प कलेतील सुवर्णपदक मिळवून आई बाबांच्या स्वप्नांचा आशेचा किरण खऱ्या अर्थाने प्रकाशमय केला. पुढे देश पातळीवर काम करण्यासाठी ते जयपूरला गेले. तेथे त्यांनी तेथे त्यांनी मोठ मोठी आंबेडकर यां महापुरुषांचे शिल्पे घडवली. आळेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नेहरूजी पं. नेहरू कोटा मध्ये त्यांनी मोठे प्रोजेकट त्यांच्या हातून साकार झाले आहेत.

तसेच त्यांची सहप्रवासी शिल्पकार सौ, करुणा किरण शिगवण त्यांनी या प्रदर्शनामध्ये त्यांचे त्यांनीही काम केले आहे. भारतीय आणि “संस्कृती परंपरा ” या वर काम केले आहे. खास करून त्यांची भावनिक विषयांवर मजबूत पकड आहे. त्यांच्या शिल्ल्यांचे विषय समाज रूढी, परंपरा, यांनी नटलेले असतात विषयांची मांडणी शिल्पाचा अर्थबोध करणारी असते. करुणा यांनाही बॉम्बे आर्ट सोसायटीचे कलाकार विभागातील शिल्पकलेतील पारितोषक मिळाले आहे.

उद्या १० फेबुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे. उभय दांपत्यांचे वरळी येथील नेहरू सेंटर कलादालनात रमणीय असं शिल्प प्रदर्शन निशुल्क पाहता येणार आहे. त्याचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिल्पकार किरण आणि करुणा यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button