रत्नागिरी

रत्नागिरी पोलीस दलाचे “मिशन जीवन” अंतर्गत लांजा व संगमेश्वर येथील सर्व “जेष्ठ नागरिकांचा अनोखा वाढदिवस” साजरा

रत्नागिरी दि. २ :- रत्नागिरी पोलीस दलाचे “मिशन जीवन” अंतर्गत लांजा व संगमेश्वर येथील सर्व “जेष्ठ नागरिकांचा अनोखा वाढदिवस” साजरा करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे “मिशन जीवन” अंतर्गत दिनांक १ जानेवारी या दिनी आपला वाढदिवस असणाऱ्या लांजा व संगमेश्वर येथील सर्व जेष्ठ नागरिकांचा एक अनोखा वाढदिवस नववर्षाच्या सुरुवातीला साजरा करण्यात आला.

या वाढदिवस कार्यक्रम पूर्व पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने लांजा व संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीमधील राहणाऱ्या व ज्यांचा वाढदिवस दिनांक १ जानेवरी असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांना निमंत्रित केले होते.

“मिशन जीवन” अंतर्गत हा वाढदिवस कार्यक्रम वेरळ व गवाणे-लांजा या गावातील सभागृहामध्ये व आंबेड खुर्द-संगमेश्वर येथील सभागृहामध्ये घेण्यात आला. या वाढदिवस कार्यक्रम करिता लांजा पोलीस ठाणे हद्दीमधील १७७ जेष्ठ नागरिक व संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीमधील ३०० जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

या विशेष वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी सर्वांना गुलाब पुष्प देऊन व केक कापून करण्यात एकत्रित रित्या साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी.बी. महामुनी, उप विभागीय पोलीस अधिकारी लांजा, श्री. सुरेश कदम, पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे, लांजा पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्री. राजाराम चव्हाण, संगमेश्वर पोलीस ठाणे, पोलीस पाटील, पोलीस अंमलदार, होम गार्ड्स व नागरिक उपस्थित होते.

या तीनही कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या भावना व्यक्त करताना अश्या प्रकारचे कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच झाल्याचे सांगीतले तसेच असे कार्यक्रम रत्नागिरी पोलीस दलातर्फे वारंवार घेण्याच्या इच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे अनेक जेष्ठ नागरिकांनी आपल्याला पोलीसरुपी आधार मिळाल्याचे देखील सांगीतले.

या दरम्यान पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे यांनी सर्वांना या “मिशन जीवन” चा लाभघेण्या बाबत सांगितले व सर्वांच्या अडी-अडचणीं ऐकून घेऊन निरसन करून जिल्हा पोलीस दलाचे सदैव सहकार्य राहणार असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमा दरम्यान वेरळ-लांजा या गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबा यांचे पद पाण्याने धुऊन व आशीर्वाद घेऊन समाजात आपले आजी-आजोबांबाबत सकारात्मक संदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button