रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे च्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांची निवड

संगमेश्वर दि. ३१ ( प्रतिनिधी ):- कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या प्रदर्शनासाठी व्यावसायिक व विद्यार्थी असे दोन विभाग असतात. या मध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे हि खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते.

यावर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या ६३व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कला महाविद्यालयातील व्यावसायिक विभागातून शिल्पकार प्रा. रुपेश सुर्वे यांची निवड झाली आहे. तसेच विद्यार्थी विभागातून २४ विद्यार्थ्यांच्या २६ कलाकृतींची निवड झाली आहे. या वर्षीचे ६३वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन सांगली या ठिकाणी संपन्न होणार आहे.यामुळे एवढ्या कलाकृती प्रदर्शनात दिसणार ही सह्याद्री कला महाविद्यालया साठी मोठी अभिमानाची बाब आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे 

मूलभत अभ्यासक्रम -रुद्र शिवगण

कलाशिक्षक पदविका प्रथम वर्ष-शुभम लिबे

कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष – नवाज हमदुले, तन्वी गोरीवले, सोनल घाणेकर,श्रावणी कुळे.

रेखा व रंगकाला विभाग – सौरभ साठे

शिल्प व प्रतिमानबंधकला विभाग- चैतन्य मांडवकर, शिवम नलावडे,संकेत गोरीवले,राज कुंभार,गौरव वाकचौरे, साहिल परुळेकर, विशाल गोवळकर,सोहम धामणस्कर,प्रथमेश गोंधळी, यशोदीप घुले, मिथिल आंगचेकर,आदित्य खर्डे, विराज खाडे,रुचित सांगळे,आयुष दहिवलकर,ज्योती पांचाळ या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कलाप्रदर्शनात झळकणार आहेत.

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर – चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे , सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव व प्राध्यापक वृंद यांनी विद्यर्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button