कणकवली नगरपंचायतीत भाजपाचा अधिकृत गट स्थापन; गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड
गट स्थापनेनंतर नगरसेवकांनी पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट

कणकवली दि. २९ : कणकवली नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” अधिकृतरीत्या स्थापन करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून, गट स्थापन करण्याबाबतचा ठराव व त्याचे इतिवृत्त सादर करण्यात आले आहे. गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आलेले आहे. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने गट स्थापन केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कणकवली नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” असा अधिकृत गट स्थापन केल्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओरोस येथे नगरसेवकांनी ही भेट घेतली.
यावेळी गटनेत्या सुप्रिया समीर नलावडे यांच्यासह भाजप गटामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून राकेश बळीराम राणे, प्रभाग क्रमांक २ मधून प्रतीक्षा प्रशांत सावंत, प्रभाग क्रमांक ३ मधून स्वप्नील शशिकांत राणे, प्रभाग क्रमांक ५ मधून मेघा अजय गांगन, प्रभाग क्रमांक ९ मधून मेघा महेश सावंत, प्रभाग क्रमांक १० मधून आर्या औदुंबर राणे, प्रभाग क्रमांक १२ मधून मनस्वी मिथुन ठाणेकर तसेच प्रभाग क्रमांक १६ मधून संजय मधुकर कामतेकर यांचा समावेश आहे. असे सदस्य उपस्थित होते.



