रत्नागिरीकरांनी पुन्हा एकदा पालकमंत्री ना. उदय सामंत यांचेवर दाखवला विश्वास!
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचा दणदणीत विजय

रत्नागिरी दि. २१ :- रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुती विजयी होणार हे नक्की होते. निकालानंतर चित्र स्पष्ट झाले. ३२ पैकी तब्बल २९ जागांवर महायुतीने विजय मिळवला. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचेवर पुन्हा एकदा रत्नागिरीकरांनी विश्वास दाखवला आहे.
गेल्या काही वर्षात रत्नागिरीमध्ये विकासाची अनेक कामे झाली. पर्यटनातून रत्नागिरीचा विकास कसा होईल यावर अधिक लक्ष केंद्रित करत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी अनेक पर्यटन स्थळे विकसित करण्यावर भर दिला. रत्नागिरी शहर सर्वांग सुंदर करत असताना नागरिकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचा परिणाम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आला.
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत ३२ जागांपैकी २९ जागा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे नेतृत्वाखाली महायुतीने जिंकल्या. नगराध्यक्ष पदही महायुतीकडे आले. केवळ तीन जागा उबाठा पक्षाला जिंकता आल्या. उर्वरित सर्वच ठिकाणी उबाठा पक्ष मागे पडला. मुळात या निवडणुकीत केवळ खड्डे हा विषय सोडता अन्य कोणतेही ठोस मुद्दे विरोधकांकडे नव्हते. त्यामुळे रत्नागिरीकर पुन्हा एकदा ना. सामंत यांचे मागे ठामपणे उभे राहिले.
या निवडणुकीत महायुतीने अनेक प्रभागात तरुण उमेदवारांना संधी दिली. वर्षभरात जो नगरसेवक चांगले काम करणार नाही, त्याचा राजीनामा घेतला जाईल, अशी ठोस भूमिका ना. सामंत यांनी यावेळी घेतली आहे. त्यामुळे महायुतीच्या निवडून आलेल्या उमेदवारांना आपला परफॉर्मन्स दाखवावाच लागणार आहे. त्यामुळे प्रभागात विकास कामे होतील, अशी अपेक्षा आता रत्नागिरीकरांकडून व्यक्त केली जात आहे.



