रत्नागिरी

जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवून जन सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा- आम. शेखर निकम 

अपवाद वगळता आमसभा खेळीमेळीत पार पडली

देवरूख दि. (सुरेश सप्रे) :- आपण जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे जनतेचे सेवक समजूनच सामान्यांनापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न सोडवासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर तालुक्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

संगमेश्वर तालुक्याची सन २०२४-२५ ची आमसभा माटे भोजने सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आम. शेखर निकम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संगमेश्वर तहसिलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी अनंत लोकरे, माजी जिप अध्यक्ष रोहन बने, राजेंद्र महाडीक, जिप माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी जिप सभापती राजन कापडी, माजी जिप सदस्य बापू शेट्ये, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख बंड्या बोरूकर, राष्ट्रवादीेचे तालुकाध्यक्ष राजू पोमेंडकर, जिप बांधकाम कार्यकारी अभियंता श्रीम. भारती, माजी नगरसेवक अभी शेट्ये, वैभव पवार,  हनिफ हरचिरकर, नितिन भोसले, अमित केतकर आदीसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

या आमसभेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात कोकण मराठी साहीत्य परीषदेच्यावतीने चपराक प्रकाशनचे ‘अक्षर यात्रा’ या पुस्तकाला पुरस्कार मिळालेबद्दल जेष्ठ पत्रकार व तालुका पत्रकार संघाचे सचिव व लेखक, चित्रकार असे हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेले जे. डी. पराडकर यांचा आम. शेखर निकम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

पंचक्रोशीत मजूर संस्था स्थापन करून रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मजुरांना पुर्वी महसुल विभागातर्फे दिला जाणारा मजुर दाखला आता मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत यावर टोल टोलवाटोलवी करून तो नक्की कोणत्या विभागाने द्यावा यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर लवकरच दिरंगाई न करता तोडगा काढला जावा अशी मागणी करण्यात आली.

नगरपंचायती कारभारवर अनेक तक्रारीवर असून ही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यावर संबधीतांची एकत्र स्वतंत्र बैठक घेवून त्वरीत कारवाई करावी असे आदेश आम. निकम यांनी नगर पंचायत प्रशासनास दीले..

यासभेत महसूल, पंचायत समिती, पशु संर्वधन, कृषि विभाग आरोग्य आदि विविध खात्यांवर साधक बाधक चर्चा करणेत आली. सभा खेळीमेळीचे वातावरणात पार पडली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button